मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात आई-वडिलांचाही लोकलखाली चिरडून करूण अंत

June 4, 2015 11:59 AM0 commentsViews:

pune local accident04 जून : आत्महत्या करण्यासाठी रेल्वेरूळावर धावत जाणार्‍या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्न करणार्‍या आई -वडिलांचाही रेल्वेखाली चिरडून करुण अंत झाल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड परिसरात घडलीये.ट्रेनखाली चिरडून या संपूर्ण कुटुंबाचा करुण अंत झालाय.

सागर कांबळे, शामल कांबळे, बलभीम कांबळे असं या घटनेत मृत्यू झालेल्या तिघांची नावं आहेत. घरात झालेल्या वादातून सागर आत्महत्या करण्यासाठी त्याच्या झोपडी बाहेरच असलेल्या रेल्वे रुळाकडे पळत सुटला.

त्यावेळी त्याच्या पाठोपाठ आई शामल आणि वडील बलभीम यांनी त्याला वाचविण्यासाठी धाव घेतली. त्याचवेळी लोणावळ्याहून पुण्याकडे जाणार्‍या लोकलखाली चिरडून या तिघांचाही मृत्यू झाला. आत्महत्या करायला निघालेल्या मुलासोबत आई-वडिलांचाही करून अंत झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close