विधानसभा अध्यक्षपद राष्ट्रवादीकडेच

November 7, 2009 8:54 AM0 commentsViews: 2

7 नोव्हेंबर विधानसभा अध्यक्षपद पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहिलं आहे. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या यादी तयार करणार्‍या अजित पवारांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी दिलीप वळसे-पाटील यांचं नाव निश्चित केलं होतं. मात्र या पदाला दिलीप वळसे पाटील यांनी नकार दिला. आपल्याला मंत्रिपदावर कायम राहायचं आहे, असं स्पष्ट केलं. त्यामुळे वळसे-पाटील यांनी आपलं मंत्रीपद वाचवण्यासाठी थेट शरद पवारांना गळ घातल्याची बातमी सूत्रांकडून मिळतेय. त्यात ते यशस्वीही झालेत. त्यामुळे या पदासाठी आता मधुकर पिचड आणि बाबसाहेब कुपेकर यांच्या नवांची चर्चा आहे.

close