अजित पवारांना चौकशीसाठी उपस्थित राहण्यात सूट

June 4, 2015 1:21 PM0 commentsViews:

ajit pawar_Acb04 जून : सिंचन घोटाळ्याप्रकरणाच्या चौकशीच्या फेर्‍यातून राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांती तुर्तास सुटका झालीये. या प्रकरणाच्या चौकशीसाठी उपस्थित राहण्याबद्दल अजित पवार यांना दोनदा समन्स बजावण्यात आलं होतं. पण आता मात्र अँटी करप्शन ब्युरो चौकशीसाठी उपस्थित राहण्यापासून अजित पवारांना सूट देण्यात आली.

मागील महिन्यात सिंचन घोटाळ्याप्रकरणी अँटी करप्शन ब्युरोने राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांना दुसर्‍यांदा समन्स बजावलीये. त्यामुळे अजित पवारांना प्रत्यक्ष चौकशीसाठी हजर राहावे लागणार होते. या अगोदरही अजित पवारांना नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, पवार राज्याबाहेर असल्यानं हजर राहू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना पुन्हा समन्स बजावण्यात येणार आहे. पण, त्याअगोदरच अजित पवारांना दिलासा मिळालाय. अँटी करप्शन ब्युरोच्या प्रश्नावलीला लेखी उत्तरं देण्याची अजित पवारांना मोकळीक देण्यात आली आहे. आता अजित पवारांना अँटी करप्शन ब्युरोच्या मुख्यालयात जाण्याची गरज नाही पण अँटी करप्शन ब्युरोने अजित पवारांना सवलत दिल्यानं आश्चर्य व्यक्त होतय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close