येत्या चोवीस तासांत मान्सून केरळमध्ये ?

June 4, 2015 1:41 PM0 commentsViews:

mansoon in keral3404 जून : मान्सूनची चातकासारखी वाट पाहण्यार्‍यांसाठी दिलासादायक बातमी…येत्या चोवीस तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. नैऋत्त मोसमी पावसानं दक्षिण अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापला आहे. त्यामुळे येत्या 24 तासात मान्सून केरळमध्ये दाखल होणार असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलंय.

मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर कोकण, गोवा आणि विदर्भात तुरळक पावसाची शक्यता असून राज्यात इतरत्र हवामान कोरडे राहिल असंही हवामान खात्यानं म्हटलं आहे.

मान्सून दाखल जरी झाला तरी यंदा सरासरी पेक्षा कमी पाऊस असणार आहे. यंदा 88 टक्के पाऊस पडले असं भाकित हवामान खात्याने वर्तवलंय. हवामान खात्याच्या अंदाजामुळे केंद्र सरकारने कमी पावसामुळे निर्माण होणार्‍या समस्यांचा सामना करण्यासाठी उपाययोजनेची तयारी सुरू केलीये.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close