आघाडीचा संध्याकाळी साडेपाच वाजता शपथविधी

November 7, 2009 8:56 AM0 commentsViews: 3

7 नोव्हेंबर अखेर शनिवारी संध्याकाळी 5.30 वाजता आघाडी सरकारचा शपथविधी होणार आहे. यावेळी राष्ट्रवादीचे 20 मंत्री शपथ घेतील, पण काँग्रेसच्या मंत्र्यांचा शपथविधी दोन टप्प्यात होणार आहे. काँग्रेसचे 16 किंवा 18 मंत्रीच पहिल्या टप्प्यात शपथ घेतील. उरलेले मंत्री दुसर्‍या टप्प्यात शपथ घेतील, असंही अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितलं. राजभवनाच्या हिरवळीवर हा मडंप सजवण्यात आला आहे. त्यामुळे हा शाही सोहळाच होणार आहे. शुक्रवारी आघाडीचे नेते अशोक चव्हाण आणि छगन भुजबळ यांनी सरकार स्थापनेचा दावा राज्यपाल एस. सी. जमीर यांच्याकडे केला.

close