कोल्हापुरात कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे 833 कोटी

June 4, 2015 4:11 PM0 commentsViews:

oos karkhandar

04 जून : राज्यातला यंदाचा उसाचा गळीत हंगाम संपला आहे. त्यामुळे आता बळीराजाला चाहूल लागलीय ती मान्सूनची, पण कोल्हापूर जिल्ह्यात पावसाळ्याच्या तोंडावरच ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कारण कोल्हापुरातल्या कारखानदारांनी ऊस उत्पादकांची तब्बल 833 कोटी रुपयांची देणी थकवली आहेत. त्यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी अडचणीत सापडला आहे.

शेतकर्‍यांच्या आर्थिक वर्षांचं मार्च एण्डींग म्हणजे 30 जून. जर 30 जूनपूर्वी पिककर्जाची रक्कम भरली नाही तर त्यांच्यासमोर व्याजाचा डोंगर आवासून उभा राहणार आहे. त्याचा परिणाम पुढच्या पिकांवरही होणार असल्यानं शेतकरी चिंतेत आहे. कारखानदारांनी एफआरपी प्रमाणं दर देणं बंधनकारक असतानाही ही रक्कम अजूनही थकीतच आहे. त्यामुळंच आता कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सरकारविरोधात आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. तर सरकारने ही रक्कम देण्यासाठी आग्रही राहून आम्हाला अनुदान द्यावं अशी मागणी कारखानदार करत आहेत. सत्तेत सामील असणार्‍या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही आता सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे.

या कारखान्यांनी थकवली रक्कम

राजाराम कारखाना – 24 कोटी रु.
आजरा कारखाना – 25 कोटी रु.
जवाहर कारखाना – 105 कोटी रु.
वारणा कारखाना – 122 कोटी रु.
दत्त शिरोळ कारखाना – 54 कोटी रु.
भोगावती कारखाना – 63 कोटी रु.
शरद कारखाना – 45 कोटी रु.
रेणुका कारखाना – 80 कोटी रु.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close