मराठमोळी सई ताम्हणकर झळकली ‘फेमिना’च्या कव्हरपेजवर

June 4, 2015 3:52 PM0 commentsViews:

magzine cover[age

04 जून : मराठी चित्रपटसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर हिला दुसर्‍यांदा ‘फेमिना’च्या कव्हरपेजवर झळकण्याचा मान मिळाला आहे.

यंदाच्या 16 जूनला प्रसिद्ध होणार्‍या फेमिनाच्या कव्हरपेजवर सई झळकणार आहे. फेमिना पॉवर लिस्ट ऑफ महाराष्ट्र 2015 च्या विनर लीस्टमध्ये सईलाही स्थान मिळालं आहे. त्यामुळेच तिची वर्णी या मासिकाच्या कव्हरपेजवर लागली आहे. सईसोबत महाराष्ट्रातल्या आणखी दोन दिग्गज महिलांच्या फोटोंचा समावेशही या कव्हरपेजवर करण्यात आला आहे.

आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर सई ताम्हणकरनं मराठी चित्रपटसृष्टीसह ‘हंटर’या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवला आहे. सईच्या याच कारकीर्दीचा गौरव फेमिनानं केला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close