एमसीए निवडणुकीत शिवसेनाXभाजप?

June 4, 2015 10:02 PM0 commentsViews:

04 जून : mca-247एमसीए निवडणुकीत राजकारणाचा आखाडा होण्याची शक्यता. बाळ महादळकर पॅनलच्या विरोधात शिवसेना रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

एमसीए निवडणुकीत क्रिकेट फर्स्ट पॅनलकडून राहुल शेवाळे आणि प्रताप सरनाईक रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर बाळ महाडदळकर पॅनलकडून आशिष शेलार उपाध्यक्षपदासाठी रिंगणात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे एमसीए निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष बघायला मिळू शकतो.

17 जूनला एमसीएची निवडणूक होणार आहे. अध्यक्षपदासाठी शरद पवारांनाही शिवसेना आव्हान देणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close