पीएसआयचं रिव्हॉल्वर पळवलं

November 7, 2009 10:38 AM0 commentsViews: 6

7 नोव्हेंबर ड्युटीवर असलेल्या पीएसआयचं रिव्हॉल्वर पळवल्याची घटना ठाण्यात घडली आहे. ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलसमोर वाहतूक शाखेचे पीएसआय राजेंद्र चौगुले वाहनांची तपासणी करत होते. त्यावेळी तिथे आलेल्या एका 24 वर्षाच्या युवकाने त्यांचं 9 एमएमचं रिव्हॉल्वर पिस्तुल पळवलं. या रिव्हॉल्वरमध्ये पिस्तुलात पाच जिवंत काडतुसं आहेत. सुमारे 40 पोलीस या रिव्हॉल्वर चोराचा शोध घेत आहेत. याबद्दल कोणाला माहिती कळल्यास 022 – 5443636, 022 – 5443535 या नंबरवर संपर्क करण्याचं आवाहन ठाणे पोलिसांनी केलंय.

close