पर्यावरण दिनाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं वृक्षारोपण

June 5, 2015 1:38 PM1 commentViews:

CGtkFhQUIAEI9fZ

05 जून : जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं पंतप्रधानांनी आज वृक्षारोपण केलं. दिल्लीतल्या 7 रेसकोर्स या त्यांच्या निवासस्थानी त्यांनी कदंबाच्या झाडाचं रोपटं लावलं. या वृक्षारोपणापासून सरकारच्या अभियानाला सुरुवात करण्यात आली. यावेळी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकरही उपस्थित होते.

दरम्यान क्रिकेटर विराट कोहली आणि कुस्तीपटू सुशीलकुमार यांनी पर्यावरण मंत्रालयाच्या आवारात वृक्षारोपण केलं. सरकारच्या वृक्षारोपण अभियानांतर्गत देशभरात 1 कोटी झाडं लावण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • shankar baburao sarkale

    nice.

close