मुख्यमंत्र्यांची पहिली सही सचिनसाठी

November 8, 2009 7:19 AM0 commentsViews: 1

8 नोव्हंबर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अशोक चव्हाण यांनी पहिली सही केली ती मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला सुभेच्छा देणार्‍या पत्रावर. सचिन तेंडुलकरने हैदराबादमध्ये झालेल्या वनडे क्रिकेटमध्ये सतरा हजार रन्सचा टप्पा पार केला. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने सचिनचं अभिनंदन केलं. सचिनला पाठवलेल्या या अभिनंदन पत्रावर अशोक चव्हाण यांनी नव्याने मुख्यमंत्री झाल्यानंतर आपली पहिली सही केली.

close