आरती कुलकर्णी यांच्या ‘नातं पश्चिम घाटाशी’ लघुपटाला पर्यावरण खात्याचा पुरस्कार

June 5, 2015 4:47 PM0 commentsViews:

arti award_34505 जून : आयबीएन लोकमतच्या सीनिअर एडिटर आरती कुलकर्णी यांच्या ‘नातं पश्चिम घाटाशी’ या लघुपटाला महाराष्ट्राच्या पर्यावरण खात्याचा पुरस्कार मिळाला आहे. पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात त्यांचा गौरव करण्यात आला.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं घोषित केलेल्या पर्यावरण विषयक माहितीपटाच्या स्पर्धेत या लघुपटाला दुसरा पुरस्कार मिळालाय. पश्चिम घाटातल्या सहा राज्यांचा प्रवास करून हा माहितीपट बनवण्यात आलाय.

पश्चिम घाटाची जैवविविधता, संवर्धनाचे प्रश्न आणि त्यासाठी झटणार्‍या कार्यकर्त्यांचे प्रयत्न यामध्ये मांडण्यात आले आहेत. नातं पश्चिम घाटाशी हा पुरस्कारविजेता लघुपट आज रात्री 9 वाजता आयबीएन लोकमतवरही दाखवण्यात येणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close