आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांना नोकरीसाठी प्राधान्य देणार -रावते

June 5, 2015 7:09 PM0 commentsViews:

Diwakar05 जून : परिवहन खात्याकडून आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना नोकरी भरतीत प्राधान्य देण्याचा उपक्रम राबवला जाणार आहे.

आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबातील पात्र व्यक्तीला एसटीच्या नोकर भरतीत प्राधान्यानं सामावून घेतलं जाईल अशी घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली.

तसंच यासंबंधीचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बालून घेतल्याय असंही दिवाकर रावते यांनी स्पष्ट केलं.

याशिवाय एसटीच्या सात हजार 630 जागांच्या चालक भरतीत पात्र उमेदवारांकडून तंबाखू सेवन आणि नशापाणी करणार नसल्याचं प्रतिज्ञापत्र घेण्यात येईल असंही रावते यांनी सांगितलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close