कल्याण- बदलापूर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

November 8, 2009 7:21 AM0 commentsViews: 59

8 नोव्हेंबर रविवारी कल्याण ते बदलापूर रेल्वे लाईनवर साडे सात तासांचा मेगाब्लॉक असेल. या स्टेशन्सदरम्यान संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सर्व लोकल्सची वाहतूक पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. उल्हासनगर स्टेशनमध्ये पादचारी पुलाचं काम सुरु असल्याने हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यादरम्यान लांब पल्याच्या काही गाड्या दिवा-पनवेल मार्गावरुन वळवण्यात आल्या आहेत. या सर्व गाड्या दिवा स्टेशनवर थांबतील. तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या काळात कल्याण ते सीएसटी दरम्यानची लोकल सुरु राहील. बदलापूर ते कर्जत इथे दर एक तासाने एक विशेष लोकलगाड्या सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांना गैरसोय होवू नये यासाठी एसटीच्या विशेष जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.

close