नांदेडमध्ये वर्‍हाडाच्या बसला भीषण अपघात, 9 जण जागीच ठार

June 6, 2015 1:00 PM0 commentsViews:

06 जून : नांदेड जिल्ह्यातील बारड येथून लग्नाला जाणार्‍या वर्‍हाडाच्या मिनीबसला समोरुन येणार्‍या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात नऊ जण ठार तर 16 जण जखमी झाले. तर सहा जणांची प्रकृती चिंताजनक आहे. काल रात्री साडेबाराच्या सुमाराला नांदेड विद्यापीठाजवळ हा अपघात झालाय. अपघातातल्या मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.nanded bus

बराड येथील सहारे कुटुंबिय लग्नासाठी कर्नाटक राज्यतील गुलबर्गा येथे निघाले होते. दोन मिनीबसमध्ये वर्‍हाडीमंडळी जात असतांना नांदेड शहरालगत विद्यापीठाजवळ समोरुन येणार्‍या ट्रकने वर्‍हाडींच्या मिनीबसला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता, की मिनिबसचा वरील भाग अक्षरश: 100 फूट लांब उडून पडला. या भीषण अपघातात बसमधील नऊ जण जागेवरच ठार झाले. तर 16 जण जखमी झाले. त्यापैकी सहा जणांची प्रकृती चिंताजनक आहे.मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जखमींवर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close