हायटेक चोरी, एटीएममध्ये व्हायरस सोडून लुटले 17 लाख !

June 6, 2015 3:36 PM0 commentsViews:

icici atm nask06 जून : नाशिकमध्ये एप्रिलमध्ये आयसीआयसीआयच्या एटीएम चोरी प्रकरणाचं गुढ आता उकललंय. दत्तमंदिर चौकातल्या ICICI बँकेच्या ATM मधून तब्बल 17 लाख रुपये चोरीला गेले होते. चोरांनी एटीएमध्ये पेन ड्राईव्ह लावून व्हायरस सोडला आणि 17 लाख लुटलं असं चौकशीत उघड झालंय.

14 एप्रिल रोजी शहरातील दत्तमंदिर चौकातील ICICI बँकेच्या एटीएम मशीनमधून 17 लाख रुपयांची चोरी झाली होती. चोरट्यांनी आधुनिक तंत्राचा वापर करुन ही धाडसी चोरी केली.

चोरांनी एटीएममध्ये प्रवेश केल्यानंतर एटीएम मशीनला पेन ड्राईव्ह लावला. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडले. आणि नंतर या एटीएम मशीनमधून 17 लाख रूपये चोरून नेले. अशा प्रकारचे गुन्हे गुजरात मध्ये ही घडले.

या प्रकरणी 16 आरोपींना गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतलंय. यातील नाशिकमधील चोरीच्या गुन्ह्यातील 2 आरोपी निष्पन्न झाले आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close