आॅल द बेस्ट, दहावीचा निकाल 8 जूनला !

June 6, 2015 5:19 PM0 commentsViews:

10th exam result 201506 जून : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षांचा निकाल येत्या सोमवारी म्हणजे 8 जून रोजी ऑनलाईन जाहीर होणार आहे. मंडळाच्या वेबसाईटवर दुपारी 1 वाजता निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. गुणपत्रिका 15 जून रोजी शाळेत 3 वाजता मिळणार आहे.

मार्च महिन्यात पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागात परीक्षा घेण्यात आली होती. यंदा दहावीच्या परीक्षेला 17 लाख 32 हजार विद्यार्थी बसले होते. 12 वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर 10 वीचा निकाल कधी जाहीर होणार याची उत्सुकता विद्यार्थ्यांना लागून होती. त्यामुळे व्हॉटस ऍप, फेसबुकवर वेगवेगळ्या तारखा जाहीर होत होत्या. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक संभ्रम अवस्थेत सापडले होते. अखेरीस आज मंडळाने तारीख जाहीर करून सर्वांना दिलासा तर दिलाच पण आता धाकधूकही वाढलीये. मागील वर्षी पेक्षा यंदा दहावीचा निकाल अगोदर लागलाय. मागील वर्षी दहावीचा निकाल 17 जूनला लागला होता यंदा तो 8 जूनला जाहीर होणार आहे.

दहावीचा निकाल या वेबसाईटवर पाहता येईल

1) www.mahresult.nic.in
2) www.hscresult.mkcl.org
3) www.rediff.com/exams
4) www.knowyourresult.com/MAHSSC

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close