मिहानमध्ये बोईंग प्रकल्पाचं काम पूर्ण

June 6, 2015 6:47 PM0 commentsViews:

mihan boeing 23406 जून : नागपूरच्या मिहान प्रकल्पातल्या भारतातला पहिला बोईंग विमानांच्या मेंटेनन्स, रिपेअरींग आणि ओव्हरऑल केंद्राचे काम पूर्ण झालंय. या प्रकल्पाच्या उद्धाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रित करण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी दिलीये.

अनेक अडथळे पार करत 1000 कोटींचा हा प्रकल्प पूर्ण झालाय आणि देशभरातल्या विमानांचे मेंटेनन्स, रिपेअरिंग आणि ओव्हरऑल याठिकाणी होणार आहे. यासाठी आता भारतातली विमानं परदेशात जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात परकीय चलन वाचणार आहे. अमेरिकेतील बोईंग कंपनीकडून भारताने 68 विमाने घेतली होती त्याबदल्यात एअर इंडिया आणि बोईंगमध्ये झालेल्या करारनुसार मेंटेनन्स, रिपेअरींग आणि ओव्हरऑल केंद्र नागपूरच्या मिहानमध्ये सुरू करण्यात आलंय.

 बोईंग प्रकल्प

-2006 मध्ये एमआरओची घोषणा झाली.
– मिहानमधील 50 एकर जागा देण्यात आली.
-2010 मध्ये एमआरओच्या कामाला सुरूवात अपेक्षित होती.
-2011 मध्ये कामाला प्रत्यक्ष सुरूवात
– बोईंगने 107 दक्षलक्ष डॉलर खर्च करून प्रकल्प उभारला, प्रकल्पात दोन हँगर आहेत.
– चार मोठी विमाने आणि सहा छोटी विमाने एकाच वेळी उभी राहू शकतात

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close