श्रीलंका टीमचं भारतात आगमन

November 8, 2009 11:12 AM0 commentsViews: 2

8 नोव्हेंबर भारत दौर्‍यासाठी कुमार संगकाराच्या नेतृत्वाखाली श्रीलंका टीमचं शनिवारी रात्री उशीरा मुंबईत आगमन झालं. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर या टीमचं कडक सुरक्षाव्यवस्थेत स्वागत करण्यात आलं. भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान सुरु असलेल्या वन डे सीरिजनंतर, भारत- श्रीलंका सीरिजला सुरुवात होईल. श्रीलंकेच्या 51 दिवसांच्या या दौर्‍यात भारत आणि श्रीलंका दरम्यान तीन टेस्ट, दोन टी-20 आणि 5 वन डे मॅच खेळणार आहेत. यातली पहिली टेस्ट अहमदाबादमध्ये येत्या 16 नोव्हेंबरला होईल. त्याआधी 11 नोव्हेंबरपासून श्रीलंका भारताच्या अध्यक्षीय टीमबरोबर एक सराव मॅचही होईल.

close