सीमाप्रश्न निकालात, भारत-बांगलादेशदरम्यान सीमाकरार

June 6, 2015 9:51 PM0 commentsViews:

pm in bangla desh406 जून : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बंागलादेश दौर्‍याचा पहिलाच दिवस ऐतिहासिक ठरला. आज (शनिवारी) भारत-बांगलादेशदरम्यान सीमाकरार झाला. भारत आणि बांगलादेशमधला गेले 41 वर्षं असलेला सीमाप्रश्न यामुळे निकालात निघाला आहे. या कराराद्वारे वादग्रस्त भूभागापैकी 510 एकर भूभाग भारताला मिळणार आहे तर 10,000 एकर भूभाग बांगलादेशला मिळणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या दोन दिवसीय बांगलादेश दौर्‍यासाठी ढाक्यात पोहोचलेत. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी ढाका विमानतळावर मोदींचं जंगी स्वागत केलं. या दौर्‍यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही मोदींसोबत आहेत. दुपारी दोन्ही देशांमध्ये गेल्या 41 वर्षांपासून प्रलंबित सीमा करारवर सह्या झाल्यात. या सीमाकरारामुळे या भागात राहणार्‍या सुमारे 50,000 लोकांच्या नागरिकत्वाचा प्रश्न सुटणार आहे. या आणि अशा इतर करारांविषयी लवकरच घोषणा करण्यात येणार आहे. याशिवाय आज नरेंद्र मोदींनी बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनजीर्ंबरोबर दोन बस मार्गांचं उद्घाटन केलं. कोलकाता-ढाका-अगरतळा आणि ढाका-शिलाँग असे हे दोन मार्ग आहेत. रिलायन्स पॉवर कंपनी बांगलादेशमध्ये 3000 मेगावॅटचा ऊर्जाप्रकल्प उभारणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशच्या राष्ट्रीय शहीद म्युझियम आणि बंगबंधु स्टेडियमलाही भेट दिली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close