भारताने मॅच आणि सीरिजही गमावली

November 8, 2009 11:14 AM0 commentsViews: 2

8 नोव्हंबर सहाव्या वन डेत ऑस्ट्रेलियानं यजमान भारताचा 6 विकेट राखून पराभव केला. या विजयाबरोबर ऑस्ट्रेलियाने सात वन डे मॅचची सीरिजही जिंकली. त्याचबरोबर आयसीसी क्रमवारीतलं आपलं नंबर वनचं स्थानही ऑस्ट्रेलियानं कायम ठेवलंय. गुवाहाटी वन डेत सर्वच बाबतीत भारतीय टीम फ्लॉप ठरली. पहिली बॅटिंग करणार्‍या भारतीय टीम अवघ्या 170 रन्समध्ये ऑल आऊट झाली. भारताचे पाच प्रमुख बॅटसमन तर फक्त 27 रन्समध्ये आऊट झाले. रविंद्र जाडेजा आणि प्रवीण कुमारने लढत देत भारताला समाधानकारक स्कोर ऊभा करुन दिला. विजयाचं हे माफक टार्गेट ऑस्ट्रेलियानं 4 विकेटच्या मोबदल्यातच पार केलं.

close