मान्सूनपूर्व पावसाच्या राज्यभर जोरदार सरी

June 7, 2015 4:26 PM0 commentsViews:

07  जून : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा असलेल्या वरुणराजाने अखरे आज (रविवारी) दुपारी राज्यातील काही भागात दमदार हजेरी लावली आहे. पुणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई आणि नाशिक येथे पावसाने दमदार हजेरी लावली आहे.  दरवर्षीप्रमाणे या वर्षीही पावसानं मृग नक्षत्र पाळल असून मुंबईत 7 जूनला हजेरी लावली आहे.

नाशिकमध्ये येवला तालुक्यात वादळी वार्‍यांसकट पाऊस पडला.तर गुहागरमध्ये झालेल्या वादळाने पेट्रोलपंप कोसळला.अनेक घरांचे पत्रे उडाले. पण कोणतीही जीवित हानी झालेली नाही. कल्याणमध्येही विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू आहे. सकाळपासूनच कल्याणमध्ये ढगाळ वातावरण होतं. अखेर दुपारी दोनच्या सुमारास जोरदार पावसाला सुरूवात झाली. पावसाच्या आगमनामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close