भाववाढ रोखण्यासाठी 88 कोटींची तरतूद

November 8, 2009 11:28 AM0 commentsViews: 12

8 नोव्हेंबर राज्यमंत्रिमंडळाच्या रविवारी झालेल्या पहिल्या बैठकीत भाववाढ रोखण्याला आणि लोडशेडींग कमी करण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. लोडशेडींग कमी करण्यासाठी एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात येणार आहे. तर भाववाढ रोखण्यासाठी 88 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. साठेबाजांवर कारवाई करण्याचे आदेशही मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या बैठकीत दिले. डिसेंबर अखेरी पासून रेशनिंग दुकानात तूरडाळ 55, साखर 20 तर पामतेल 30 रूपये किलोने मिळणार आहे. 2012 पर्यंत राज्य लोडशेडींगमुक्त करणार, कापूस खरेदी सुरूच राहील तसंच शेतकर्‍यांची आर्थिक कोंडी होऊ देणार नाही असं आश्वासनही सरकारनं दिलं आहे. सोमवारपासून विधानसभेच्या अधिवेशनाला सुरूवात होणार आहे.

close