आघाडीचं खाते वाटप जाहीर

November 9, 2009 8:19 AM0 commentsViews: 9

9 नोव्हेंबर रविवारी मध्यरात्री काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचे खातेवाटपही जाहीर झाले. निवडणूका झाल्यानंतर पंधरा दिवसांनी सरकार स्थापन झालं. थाटामाटात शपथविधीही पार पडला. मात्र जेष्ठमंत्र्याना कोणती खाती द्यायची यावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद होता. मात्र त्यावर तोडगा काढत काँग्रेस राष्ट्रवादीने मंत्र्याची खाती जाहीर केली. काँग्रेस मध्ये मुख्यमंत्रिपदासह अशोक चव्हाण यांनी स्वताकडे नगरविकासमंत्री,गृहनिर्माणमंत्री ठेवलं आहे.काँग्रेसच्या कॅबीनेट मंत्र्याची यादी नारायण राणे – महसूलमंत्रीपतंगराव कदम – वनमंत्रीशिवाजीराव मोघे – समाजकल्याणमंत्रीराधाकृष्ण विखे पाटील – परिवहनमंत्री, बंदरे खातंहर्षवर्धन पाटील – सहकार पणनमंत्री, संसदीय कामकाजमंत्रीबाळासाहेब थोरात -शेती, कृषीमंत्री, अतिरिक्त शालेय मंत्रीराजेंद्र दर्डा – उद्योगमंत्रीसुरेश शेट्टी – आरोग्यमंत्री, पर्यावरणमंत्री, राजशिष्टाचार, क्रिडा, युवा कल्याणनसीम खान – वस्त्रोद्योगमंत्री, औकाफमंत्रीनितीन राऊत – मत्स्य, पशुसंवर्धनमंत्रीसुभाष झनक – महिला आणि बालकल्याणमंत्री काँग्रेसच्या राज्यमंत्र्यांना दिलेली खाती विजय वडेट्टीवार – ऊर्जा व जलस्त्रोतरमेश बागवे – गृहमंत्री(शहर)अब्दुल सत्तार -अन्न व नागरी पुरवठावर्षा गायकवाड – वैद्यकीय शिक्षणरणजीत कांबळे – ग्रामविकासपद्माकर वळवी – आदिवासी विकासराष्ट्रवादी च्याही खातेवाटपात दिग्गज नेत्यांना धक्का दिला असून आर.आर पाटील यांच्याकडे पुन्हा गृहखात्याचा कारभार सोपवण्यात आला आहे. छगन भुजबळ यांच्याकडे – उपमुख्यमंत्रीपदासह सार्वजनिक बांधकाम विभाग राष्ट्रवादीच्या कॅबीनेट मंत्र्यांची यादी आर. आर. पाटील – गृहमंत्रीअजित पवार – ऊर्जा आणि जलसंपदामंत्रीजयंत पाटील – ग्रामविकासमंत्रीसुनील तटकरे – वित्त आणि नियोजनमंत्रीमनोहर नाईक -अन्न आणि औषध प्रशासनमंत्री गणेश नाईक – उत्पादन शुल्कमंत्रीहसन मुश्रीफ -कामगारमंत्री विजयकुमार गावित – वैद्यकीय शिक्षणमंत्रीअनिल देशमुख- अन्न व नागरी पुरवठामंत्री जयदत्त क्षीरसागर – बांधकाम सार्वजनिक उपक्रममंत्रीलक्ष्मण ढोबळे – पाणी पुरवठामंत्रीराजेश टोपे – उच्च व तंत्रशिक्षणमंत्रीरामराजे निंबाळकर – जलसंपदा कृष्णाखोरेमंत्रीबबनराव पाचपुते – आदिवासी विकासमंत्रीराष्ट्रवादीच्या राज्यमंत्र्याची यादी भास्कर जाधव – यांच्याकडे नगरविकाससचिन अहिर- गृहनिर्माण फौजिया खान – सामान्य प्रशासन प्रकाश सोळंके – महसूल व पुनर्वसनगुलाबराव देवकर – कृषी व पशुसंवर्धन खातं

close