अबू आझमींना मनसे आमदारांची धक्काबुक्की

November 9, 2009 9:24 AM0 commentsViews: 129

9 नोव्हेंबर हिंदीतून शपथ घेणार्‍या अबू आझमींना मनसे आमदारांनी आज विधान भवनात शपथ घेण्याच्या मुदद्यावरुन जोरदार धक्काबुक्की केली. मनसेचे खडकवासल्याचे आमदार रमेश वांजळे यांनी तर आझमींसमोरचं पोडियमच उचललं. त्यानंतर राम कदम, प्रवीण दरेकर, शिशिर शिंदे, वसंत गिते आदी मनसेच्या तेराही आमदारांनी आझमींना घेराव घालत त्यांना धक्काबुक्की केली. संसदीय कामकाजमंत्री हर्षवर्धन पाटील आणि आघाडीच्या आमदारांनी मनसेच्या आमदारांना आवरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अध्यक्षांनी विधानसभेचं कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब केलं होतं. पण त्यानंतर विधानसभेचं कामकाज पुन्ह सुरू झालं. आता मनसे कार्यकर्त्यांवर निलंबनाची कारवाई होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आत्तापर्यंत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह 27 मंत्र्यांनी घेतलीय. तर आमदारांचा शपथविधी सुरू आहे. हे विशेष अधिवेशन बुधवारपर्यंत चालणार आहे. तसंच या अधिवेशनात नव्या विधानसभेच्या अध्यक्षांचीही निवड केली जाणार आहे.

close