नवी मुंबईत चक्क नाल्यावर उभारली सात मजली इमारत

June 8, 2015 12:35 PM0 commentsViews:

rupa solitarie

08  जून : नवी मुंबईच्या एमआयडीसीमध्ये चक्क नाल्यावर सात मजली इमारत उभारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नवी मुंबईतील महापे भागात डोंगरावरून येणार्‍या पावसाच्या पाण्याचा मोठा नाला एमआयडीसीमधून जातो. पण या 20 फूटाच्या नाल्यावर चक्क सात मजली इमारत उभारण्यात आली आहे. एवढंच नाहीतर 20 फूट असलेला नाला इमारती खालून जाताना फक्त 5 फूट इतका कमी करण्यात आला आहे.

महापे मिलेनियम बिझनेस पार्कमधील रूपा सॉलिटेअर या कंपनीने ही 7 मजली पार्किंगसाठी इमारत उभारली आहे. पावसाचं पाणी वाहून नेणारे नाले बंदिस्त करता येत नाहीत. एमआयडीसीच्या डोळ्यादेखत ही इमारत उभारली. पण तरीही यावर कारवाई केली जात नाहीये.या नाल्याची पाहणी करून कारवाई केली जाणार असल्याचे नवी मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी सांगितलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close