‘आयफा’मध्ये ‘क्वीन’, ‘हैदर’ची धूम

June 8, 2015 2:50 PM0 commentsViews:

haider and queend

08  जून :  गेल्या 3 दिवसांपासून मलेशियाच्या क्वालालंपुरमध्ये सुरू असलेल्या 16व्या आयफा अवार्डची आज घोषणा करण्यात आली. आयफा 2015मध्येही कंगणा रणावत बॉलिबूडची क्वीन ठरली आहे. तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून सन्मानित करण्यात आलं आहे. तर शाहीद कपूरला ‘हैदर’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

दिग्दर्शक सुभाष घई यांचा यंदा आयफा लाइफ टाईम अचिव्हमेंट अवार्डने गौरव करण्यात आला आहे. तर दीपिका पदुकोणला वूमन ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे.

16 व्या आयफा अवार्ड विजेत्यांची नावं :

 • बेस्ट फ्लिम : क्वीन
 • बेस्ट ऍक्टर(मेल) : शाहीद कपूर (हैदर)
 • बेस्ट ऍक्टर (फीमेल) : कंगणा रणावत (क्वीन)
 • बेस्ट डायरेक्टर : राजकुमार हिरानी (पीके)
 • बेस्ट सर्पोटिंग ऍक्टर (मेल) : रीतेश देशमुख (एक विलेन)
 • बेस्ट सर्पोटिंग ऍक्टर (फीमेल) : तब्बू (हैदर)
 • बेस्ट नेगेटिव्ह रोल : केके मेनन (हैदर)
 • वूमन ऑफ द इयर : दीपिका पदुकोण
 • बेस्ट कॉमिक रोल : वरूण धवन (तू मेरा हिरो)
 • बेस्ट डेब्यू ऍक्टर (मेल) : टायगर श्रॉफ (हिरोपंती)
 • बेस्ट डेब्यू ऍक्टर (फीमेल) : किर्ती सेनन (हिरोपंती)
 • बेस्ट सिंगर : अरजित सिंह (तेरी गलियां)
 • बेस्ट रिजनल फिल्म : लय भारी (मराठी)

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close