10वीत नापासांनो, नाराज होऊ नका; जूनमध्येच परीक्षेची मिळणार संधी

June 8, 2015 3:47 PM0 commentsViews:

1oth exam fail08 जून : दहावी परीक्षेत पास होणार्‍यापेक्षा आम्हाला नापासांची चिंता अधिक आहे. तेव्हा, नापास विद्यार्थ्यांना लगेच जूनमध्येच परीक्षा देण्याविषयीचा प्रस्ताव शासनाकडे विचाराधीन असल्याचं वक्तव्य शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केलंय. त्यामुळे,नापास होणार्‍या विद्यार्थ्यांसाठी ही एक प्रकारे सुवर्णसंधी असून कुणाचेही वर्ष वाया जाणार नाही. तर,येत्या अधिवेशनात मराठी ही राज्यभाषा असल्याचे विधेयक पारित करणार असल्याचंही तावडे म्हणाले.

शिक्षणमंत्री तावडे यांनी आपले शिक्षण खाते म्हणजे नेचरल गेससारखे असल्याचे सांगून कायम धाकधूक वाटत असल्याचं म्हटलंय.महाराष्ट्राच्या कुठल्याही कायद्यात मराठी राजभाषा असल्याचा उल्लेख नसल्याचे नमूद करून तावडे यांनी आगामी अधिवेशनात याबाबतचे विधेयक मांडणार असल्याचं सांगितलं. तर,दहावीच्या निकालाबाबत बोलताना त्यांनी,पास होणार्‍यांपेक्षा आपणास नापासांची जास्त चिंता असून जर मार्चमध्ये परीक्षा झाल्या तर मे मध्येच निकाल लागणे गरजेचे असून त्यानुसार नापास विद्यार्थ्यांची जून महिन्यातच परीक्षा घेण्याचा विचार सुरु आहे.नापासना एक संधी मिळणे गरजेची आहे.त्यामुळे त्यांचे वर्ष फुकट जाणार नाही.शासन या प्रस्तावावर विचार करीत असून आता नाही जमले तर आगामी दोन वर्षांत हे नक्कीच प्रत्यक्षात येईल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close