माडकर खून प्रकरणाचं रहस्य उलगडलं

November 9, 2009 9:26 AM0 commentsViews: 10

9 नोव्हेंबर सोलापूरमधल्या सुनील माडकर खून प्रकरणातलं सत्य बाहेर आलं आहे. माडकरची पत्नी सविता हिनंच आपला गुन्हा कबूल केला आहे. हा खून विवाहबाह्य संबंधांमधून झाला असल्याचं आता स्पष्ट झालंय. सविता माडकर हिला पोलिसांनी या प्रकरणी अटक केली आहे. सोलापूरचे पुरवठा अधिकारी आणि उपजिल्हाधिकारी सुनील माडकर यांची 28 आक्टोबर रोजी त्यांच्या सरकारी निवासस्थानी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी प्रमुख आरोपी म्हणून प्रकाश लाटे याला अटक करण्यात आली होती. त्याने ट्रकसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. लाटेहा सुनिता माडकर यांचा मामेभाऊ होता. त्याचे आणि सुनिताचे विवाहबाह्य संबंध होते अशी माहिती पुढं येत आहे. सविता माडकर आणि प्रकाश लाटे यांच्या मोबाईलच्या रेकॅर्डवरून पोलिसांनीया खुनाचा छडा लावला. ज्या रात्री सुनिल माडकर यांची हत्या झाली त्या रात्री प्रकाश लाटे सोलापुरात होता. सुनिल माडकर यांचा खून केल्यानंतर तो पहाटे तीन वाजता पुण्याला गेल्याचे सबळ पुरावे पोलिसांना मिळाले आहेत.

close