योग दिन म्हणजे हिंदू पद्धती लादणं ; मुस्लिम बोर्डाचा विरोध

June 8, 2015 4:32 PM0 commentsViews:

 
suryanamskar in school08 जून : योग दिनाच्या दिवशी शाळांमध्ये योगा आणि सूर्यनमस्कार सक्तीचं करण्याला मुस्लिम लॉ बोर्डाने विरोध केलाय योगा आणि सूर्यनमस्कार या प्रकारांच्या सक्तीला आमचा विरोध आहे, आम्ही याविरोधात देशव्यापी मोहीम सुरू करू, असा इशाराही मुस्लिम बोर्डाने दिलाय.

असं करणं म्हणजे हिंदू धर्माच्या पद्धतींना लादणं आहे, हा आदेश बेकायदेशीर आणि घटनाविरोधी आहे असा दावाही मुस्लिम लॉ बोर्डाने केलाय. विशेष म्हणजे या आदेशविरोधात मुस्लिम बोर्डाने कोर्टात धाव घेतलीये.

पण योग दिन शाळेत करणं हे सक्तीचं नाहीच, अशी भूमिका सरकारने स्पष्ट केलीये. येत्या 21 जूनला आंतराष्ट्रीय पहिला योग दिन साजरा करण्यासाठी केंद्र सरकारने जोरदार तयारी सुरू केलीये.

21 जून रोजी सर्व शाळांमध्ये योग दिन साजरा करण्यासाठी विद्यार्थ्यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहे. पण, योग दिनावर आता मुस्लिम बोर्डाने हरकत घेतलीये.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close