जे. डे. हत्या प्रकरणी जिग्ना व्होरासह 10 जणांविरोधात आरोप निश्चित

June 8, 2015 5:50 PM0 commentsViews:

j d jigna08 जून : मिड डेचे पत्रकार जे. डे. हत्या प्रकरणी विशेष मोक्का कोर्टाने आरोप निश्चित केलेत. या आरोपत्रात पत्रकार जिग्ना व्होरासह दहा आरोपींविरूद्ध आरोप निश्चित करण्यात आले आहेत.

11 जून 2011 रोजी मिड डेचे पत्रकार ज्योतीद्रकुमार डे (जे.डे) यांची पवईमध्ये राहत्या घराजवळ चार हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. या प्रकरणी छोटा राजनच्या गँगच्या 4 जणांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी सर्वात धक्कादायक म्हणजे पत्रकार जिग्ना व्होराची अटक. जिग्नाने छोटा राजनला जे.डे यांच्या गाडीचा आणि परळ येथील कार्यालयाचा पत्ता दिला होता. 2011 साली या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. त्यात 11 जणांना अटक आणि दोघे फरार दाखवण्यात आले. पण, आरोप निश्चित करण्यात आले नव्हते. आज या प्रकरणाला 4 वर्षं पूर्ण होत आहे अखेरीस आजा विशेष मोक्का कोर्टाने सर्व आरोपींवर आरोप निश्चित केले आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close