कोकण किनारपट्टीवर अशोबा वादळाचं सावट ?

June 8, 2015 7:13 PM0 commentsViews:

08 जून : कोकणात मान्सून अजूनही सक्रीय झालेला नाही. इथं समुद्रात वारे वेगाने वाहतायत. अरबी समुद्रात तयार झालेलं अशोबा वादळ सक्रीय झालं तर त्याचा प्रभाव होऊन गोव्यासह कोकण किनारपट्टीवर वेगाने वारे वाहतील आणि पाऊसही पडेल असा हवामान खात्याने अंदाज व्यक्त केलाय.

नैऋत्य मोसमी वार्‍यांनी पश्चिम किनारपट्टीच्या भागात वेगाने प्रगती करत तळ कोकणापर्यंत मजल मारली आहे. रत्नागिरीपर्यंत धडक देणार्‍या मॉन्सूनने दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूरचा दक्षिणेकडचा भागही व्यापला असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. अरबी समुद्रात आलेल्या वादळाची तीव्रता वाढली असून, त्याचे अशोबा या चक्रीवादळात रुपांतर झाले आहे.

weather map सोमवारी मॉन्सूनने मध्य अरबी समुद्राचा आणखी काही भाग, संपुर्ण गोवा, दक्षिण कोकणाचा काही भाग, कर्नाटक किनारपट्टीचा उर्वरीत भाग कर्नाटकचा अंतर्गत भागातही शिरकाव केलाय. अशोबा चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक स्थिती निर्माण झाली आहे. बुधवारपर्यंत कोकण, कर्नाटक, अरबी समुद्राचा आणखी काही भाग तामिळनाडूचा उर्वरीत भाग आंध्रप्रदेशच्या काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close