सीमाप्रश्नी दिलेल्या योगदानाबद्दल आय.बी.एन. लोकमतचा गौरव

November 9, 2009 9:28 AM0 commentsViews: 2

9 नोव्हेंबर सीमा प्रश्नासाठी आय.बी.एन लोकमतनं दिलेल्या योगदानाबद्दल, बेळगावमधील स्वराज्य या संस्थेच्यावतीने आय.बी.एन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. कर्नाटक शासनाच्या अत्याचारानं हैराण झालेल्या सीमावासियांचे प्रश्न आय.बी.एन-लोकमतनं वेळोवेळी मांडलेत. पण या आंदोलनाची धुरा युवा पिढीकडे द्यायला हवी असं मत आय.बी.एन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी व्यक्त केलं. या कार्यक्रमात आय.बी.एन.लोकमतनं नेहमीचं सीमावासियांना महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. यापुढंही त्याच जोमानं सहकार्य करावं अशी अपेक्षा सीमावासियांनी या कार्यक्रमात व्यक्त केली. त्यावेळी आय. बी.एन. लोकमतंच व्यासपीठ हे सर्वांसाठी उपलब्ध असल्याचं निखिल वागळे यांनी सांगितलं.

close