शिवसेनेचं टोल विरोधी आंदोलन

November 9, 2009 9:34 AM0 commentsViews: 1

9 नोव्हेंबर अधिवेशनासाठी विधानसभेत जाताना शिवसेनेच्या नवनिर्वाचीत आमदारांनी ठाण्याच्या टोलनाक्यावर आंदोलन केलं. सोमवारी टोलनाक्यांच्या विरोधात आंदोलन करुन वाहनधारकांना मोफत प्रवास करण्याचा सल्ला दिला. ठाण्याला टोलमुक्त करण्याचं आश्वासन निवडणुकीआधी शिवसेनेनं मतदारांना दिलं होतं. शपथविधीला जाण्याआधी आनंदनगर टोलनाक्यावर त्यांनी हे आंदोलन केलं. पण सेना नेत्यांची पाठ फिरताच या टोल नाक्यावर पुन्हा टोलवसुली सुरू झाली. त्यामुळे सेना नेत्यांच्या आंदोलनाच्या काहीच परिणाम झाला नसल्याच वाहनधारकांचं म्हणणं आहे.

close