करून दाखवलं ?, कोस्टल रोडवरून सेना-भाजपमध्ये जुंपली

June 8, 2015 11:08 PM0 commentsViews:

costal raod sena vs bjp08 जून : मंुबईसाठी महत्त्वाच्या कोस्टल रोडला परवानगी मिळाली आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं या महत्त्वाच्या प्रकल्पाला हिरवा कंदील दिला आहे. पण, शिवसेना-भाजपमध्ये आता कोस्टल रोडच्या मुद्यावरुन श्रेयवादाचं राजकारण सुरू झालंय.

कोस्टल रोड प्रकल्प हा महापालिका करेल असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र नेंदरलँडच्या कंपनीसोबत करार करण्याच्या तयारीत आहेत. मुख्यमंत्र्यांनी नेदरलँडच्या कंपनीकडून या प्रकल्पाचा आराखडा तयार करुन घेतलाय. 2017 साली होणार्‍या महापालिका निवडणुकांवर दोन्ही पक्षांचा डोळा असल्यामुळे हा प्रकल्पाचं श्रेय घेण्यावरुन दोन्ही सत्ताधारी पक्षांमध्ये पुन्हा एकदा जंुपलीये. आदित्य ठाकरे यांनीही ट्विट करून शिवसेनेची पाठ थोपटून घेतलीये.

आदित्य ठाकरे म्हणतात, “आपल्या जाहीरनाम्यात दिलेलं आश्वासनाची पूर्तता करत असल्याबद्दल आपलं अभिनंदन…चार वर्षापूर्वी महापालिकेनं हा प्रस्ताव मांडला होता. पर्यावरण मंत्रालयाची मान्यता मिळण्यासाठी बराच अवधी लागला. गेल्या महिन्यात खासदारांनी यासंदर्भात धरणं आंदोलनही केलं होतं. मुंबईकरांना या कोस्टल रोडचा होणार फायदा होणार आहे. महापालिका उत्तमरित्या हा प्रकल्प राबवेल हा विश्वास आहे.”

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close