झारखंड : पोलिसांच्या चकमकीत 12 माओवादी ठार

June 9, 2015 8:59 AM0 commentsViews:

CHBnRK5UAAAEivy09 जून : झारखंडमधल्या पलामू जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्री पोलिसांच्या चकमकीत 12 माओवादी ठार झाले आहेत.

पलामू जिल्ह्यातील सतबरवा जंगलातल्या एका रस्त्यावरून माओवादी स्कॉर्पिओ गाडीतून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर सापळा रचून त्यांनी या गाडीवर गोळीबार करत गाडीतल्या 12 माओवाद्यांना ठार मारलं. माओवाद्यांना गोळीबार करण्याची संधीच दिली नाही.

या माओवाद्यांकडून 8 रायफल्स आणि 220 काडतूस जप्त करण्यात आली आहेत. या गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात शोधमोहिम करण्यात येत आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close