आझमींच्या शपथेचे राज्याभरात तीव्र पडसाद

November 9, 2009 10:44 AM0 commentsViews: 3

9 नोव्हेंबरअबू आझमींनी हिंदीत शपथ घेतल्यानंतर राज्यभरात तीव्र पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. ठाण्यात मनसेचे कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून अबू आझमींच्या पुतळ्याला चपलांचा हार घातला. तसेच त्यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं. याप्रकरणी मनसेच्या आठ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.राज्याच्या विविध ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी आझमींविरोधात आंदोलन केलं आहे. तर भिवंडीत अबू आझमी समर्थक समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तीन बसेस फोडल्या आहेत. तर मुंब्रा येथे रस्ता रोको करणार्‍या सपाच्या 38 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. भिवंडीत तणावपूर्ण शांतता असून या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे.

close