मनसेचे 4 आमदार 4 वर्षांसाठी निलंबित

November 9, 2009 12:56 PM0 commentsViews: 1

9 नोव्हेंबर मनसेच्या 4 आमदारांवर 4 वर्षांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. शिशिर शिंदे, वसंत गीते, रमेश वांजळे, राम कदम या आमदारांचा त्यात समावेश आहे. संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मनसेच्या 4 आमदारांविरूद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव विधानसभेत मांडला. त्यानंतर मनसेच्या आमदारांना निलंबित करण्याचा प्रस्ताव विधानसभेचे हंगामी अध्यक्ष गणपतराव देशमुख यांनी मंजूर केला. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना शपथ घेण्यापासून मनसे आमदारांनी रोखलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला. विधानसभेतल्या वर्तनाबद्दल मनसे आमदारांवर कारवाई करण्यात आली असल्याचा खुलासा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला. दरम्यान मराठीसाठी कुठल्याही कारवाईला तयार असल्याचं मनसेचे निलंबित आमदार शिशिर शिंदेंनी सांगितलं. तर या निलंबनाविरुद्ध कोर्टात दाद मागणार असल्याचं मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.

close