विधानसभेतला राडा हे मराठीचं फिक्सिंग : सामनातून बाळासाहेबांची टीका

November 10, 2009 6:50 AM0 commentsViews: 5

10 नोव्हेंबरविधानसभेत मनसेने घातलेल्या राड्याबद्दल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरें यांनी सामनामधून टीका केली आहे. हा सगळा गोंधळ म्हणजे फिक्सिंग असल्याच आरोप शिवसेनाप्रमुखांनी केलाय. अबू आझमींनी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी, हे सगळं घडवून आणल्याचा आरोप सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आलाय. तसंच बाळासाहेबांनी मनसेवरही टीका केली. आझमींनी हिंदीतून शपथ घेतल्यावर राडा करणारे, बाबा सिद्धीकींनी इंग्रजीतून शपथ घेतल्यावर का गप्प राहले, तसंच अमिन पटेल यांच्यासारख्या आमदारांना का मोकळं सोडलं, तसंच विधानसभेतच कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण होत नसेल तर बाहेर ते कसे होणार असा सवाल अग्रलेखात करण्यात आलाय.

close