विरोधी पक्षनेतेपदी एकनाथ खडसेंची निवड होण्याची शक्यता

November 10, 2009 7:07 AM0 commentsViews: 2

10 नोव्हेंबरविधानसभेतले विरोधी पक्ष नेते म्हणून भाजपचे गटनेते एकनाथ खडसे यांची निवड होण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षांना भाजप आणि शिवसेनेनं याविषयी संयुक्त निवेदन दिलंय. या निवडणुकीत भाजपचे 46 तर शिवसेनेचे 44 आमदार निवडून आलेत. त्यामुळं साहजिकच भाजपकडे विरोधी पक्षनेतेपद द्यायला शिवसेनेनं संमती दिलीय. विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड झाल्यानंतर नवे अध्यक्ष सेना-भाजपच्या निवेदनाला मान्यता देतील. त्यामुळं विरोधी पक्षनेत्याच्या नावाची अधिकृत घोषणा उद्या होण्याची शक्यता आहे.

close