अबू आझमींची बाळासाहेबांवर टीका : शिवसैनिक खवळले

November 10, 2009 7:57 AM0 commentsViews: 6

10 नोव्हेंबर विधानसभेत जाण्यापूर्वी अबू आझमींनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर टीका केली. सामनाच्या अग्रलेखात आझमी आणि विधानसभेतल्या मनसेच्या राड्याबद्दल लिहीताना ठाकरेंनी याला मराठीचं फिक्सिंग असं म्हटलंय. त्यावर प्रतिक्रिया देताना आझमी यांनी वाढत्या वयासोबतच बाळासाहेबांची बुद्धी लहान मुलासारखी होत चालली आहे. बाळासाहेब स्वत:च निवडणुकीनंतर मराठी माणसांवर नाराज झालेत, असं पत्रकारांशी बोलताना म्हटलं.अबू आझमींनी शिवसेनाप्रमुखांवर टीका केल्यानंतर त्यांचा विधानभवन परिसरातच शिवसैनिकांनी निषेध केला. तसंच जाब विचारण्यासाठी त्यांनी अबू आझमींची गाडीही अडवली. पण आपण बाळासाहेबांवर टीकाच केली नाही, असं सांगत आझमींनी तिथून सुटका करून घेतली.

close