कामं होत नसतील तर सहकार्य कशाला ?, सेना भाजपवर नाराज

June 9, 2015 10:27 PM0 commentsViews:

Uddhav-fadnavis09 जून : शिवसेना आणि भाजपमधली धुसफूस सुरूच आहे. शिवसेनेची कामं होत नसतील तर का सहकार्य करायचं ?, असा नाराजीचा सूर शिवसेनेच्या आमदार आणि मंत्र्यांच्या बैठकीत उमटलाय.

विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप याची युती तुटली आणि सत्तेसाठी दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र आले. सत्ता स्थापनेनं युतीचा संसार सुखाने सुरू राहिल अशी शक्यता होती पण तेही फोल ठरले. युतीत वारंवार धुसफूस सुरूच आहे. आता पुन्हा एकदा काम करण्यास संधी मिळत नसल्याची नाराजी सेनेच्या मंत्र्यांनी केलीये. सेनेचे आमदार आणि मंत्र्यांची बैठक पार पडलीये. सरकारमध्ये सन्मान नसेल तर सरकारमध्ये कशाला राहायचं अशीही चर्चा या बैठकीत झाल्याचं समजतंय. शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांचे निर्णय परस्पर घेतले जातात मग आमचा सत्तेत सहभाग कसा असणार अशा तक्रार शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांनी मांडली आहे. या घडामोडी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या कानावर पोहचवणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे, या अगोदरही सेनेच्या मंत्र्यांनी काम करण्यास संधी मिळत नसल्याची तक्रार केली होती. दोन्ही पक्षांत वाद होत असल्यामुळे समन्वय समिती स्थापन करण्यात आलीये.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close