भारतीय सैन्याने म्यानमारमध्ये घुसून 20 अतिरेक्यांचा केला खात्मा

June 9, 2015 10:36 PM0 commentsViews:

indian army attack myanmar09 जून : मणिपूरमध्ये दहशतवाद्यांनी भ्याड हल्ल्यात 18 जवान शहीद झाले होते. भारतीय जवानांनीही ‘ईट का जवाब पत्थर से देत’ थेट म्यानमारमध्ये घुसून 20 अतिरेक्यांचा खात्मा केलाय. भारतीय लष्कराने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून दहशतवाद्यांवर हल्ला चढवण्याची कामगिरी करुन दाखवली आहे.

भारत-म्यानमार सीमेवर भारतीय जवानांनी म्यानमार लष्कराच्या मदतीने ही संयुक्त कारवाई केली. भारतीय लष्कराच्या या पहिल्याच क्रॉस बॉर्डर ऑपरेशनची माहिती आज (मंगळवारी) भारतीय लष्कराचे अतिरिक्त महासंचालक रणधीर सिंग यांनी दिली.

चारच दिवसांपूर्वी मणिपूरमधल्या चांदेलमध्ये एनएससीएनच्या दहशतवाद्यांच्या गटानं भारतीय लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला होता, ज्यात वीस जवान शहीद झाले होते. यानंतर संपूर्ण परिसरात हायऍलर्ट घोषित करण्यात आला होता.

त्याच दहशतवाद्यांनी पुन्हा तसाच हल्ला करण्याची योजना आखली होती, आणि त्याचा आयबी आणि रॉकडून सुगावा लागताच लगेचच दहशतवाद्यांवर हल्ला करण्याचा निर्णय घेतल्याचं भारतीय लष्कराकडून सांगण्यात आलं. भारत आणि म्यानमार यांनी केलेल्या या संयुक्त कारवाईत दहशतवाद्यांचे काही तळही उद्‌ध्वस्त झालेले आहेत. या कारवाईसाठी हवाई दलाच्या मिग-17 या हेलिकॉप्टरचा वापर झाला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close