बोगस डिग्री भोवली ; जेल झाली आणि मंत्रिपदही गेलं !

June 9, 2015 11:19 PM0 commentsViews:

09 जून : पदवीचं बोगस प्रमाणपत्र दिल्या प्रकरणी अखेर दिल्लीचे कायदामंत्री जितेंद्र तोमर यांना पदावरून पायउतार व्हावे लागले आहे. जितेंद्र तोमर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. आपल्या पदाचा राजीनामा त्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे सोपवलाय.LAW-MINISTER-hindi

दिल्लीचे कायदा मंत्री जितेंद्र तोमर यांना आज (मंगळवारी) सकाळी अटक करण्यात आलीये. फसवणूक आणि खोटी कागदपत्रं तयार केल्याप्रकरणी तोमर यांना अटक करण्यात आलंय. पदवीचं बोगस प्रमाणपत्र सादर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तोमर यांचा खटला दिल्ली हायकोर्टात प्रलंबित आहे. तोमर यांना हौज खाज पोलीस स्टोशनमध्ये नेण्यात आलंय. त्यांना न्यायालयात हजर केले असता 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये.

जितेंद्र तोमर यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईमुळे आपच्या गोटात एकच खळबळ उडाली. आपच्या नेत्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. गृहमंत्रालयाच्या आड सरकार कारवाई करत आहे असा आरोप आपचे नेते मनीष सिसोदिया यांनी केलाय. तोमर यांच्या अटकेनंतर संध्याकाळी त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामाही दिलाय.

जितेंद्र तोमर यांच्यावर आरोप

तोमर यांनी बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातून तिलका मांझी भागलपूर विद्यापीठातून विधी शाखेची बोगस पदवी (लॉ डिग्री) मिळवली.
दिल्ली हायकोर्टाने आदेश दिल्यानंतर या विद्यापीठातून तोमर यांनी कोणतीही पदवी घेतली नसल्याचं निष्पन्न झालं. तोमर यांनी 18 मे 2001 रोजी राजेंद्र प्रसाद यांची स्वाक्षरी असलेलं बोगस लॉ प्रोव्हिजेनल सर्टिफिकेट क्रमांक 3687 स्वत: च्या नावे दाखवलंय. धक्कादायक म्हणजे हे सर्टिफिकेट त्याच्या नावे नसून ते संजय कुमार चौधरी यांच्या नावे आहे. त्यामुळेच दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली. आणि आज कायदा मंत्री जेलमध्ये गेले.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close