शाब्बास सविता, धुणीभांडी करूनही दहावीत मिळवले 90 टक्के गूण !

June 9, 2015 8:47 PM0 commentsViews:

सिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद

09 जून : दहावीच्या परीक्षेत सामान्य कुटुंबातील अनेक विद्यार्थ्यांनी परिस्थितीवर मात करून यश संपादन केलय..औरंगाबादेतील सविता जगतापनं धुणीभांडी करून गुणवत्ता मिळवलीय. खास करून महानगर पालिकेच्या शाळेत कोणत्याही महागड्या ट्युशन शिवाय तीनं हे यश मिळवत किमया घडवलीय..सविताची ही संघर्ष

savita jagtapसविता जगताप ही सर्वसामान्य कुटुंबातली झोपडपट्टीत राहणारी विद्यार्थीनी. सविताला दहावीच्या परीक्षेत 90 टक्के मार्क मिळालेत. सविताची आई कविताबाई अशिक्षित आहे. पण तिने धुणीभांडी करत सविताला शिक्षणाबद्दल चिकाटीचे धडे दिले. आई आजारी असते. तिला घरकाम होत नाही म्हणून सवितासुद्धा धुणीभांडी करते. सविताचे वडील संजय जगताप हॉटेलमध्ये रोजंदारीवर काम करतात.
घर चालवण्यासाठी पैसे कमावण्याच्या प्रयत्नात सविताच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही. पण आता तिच्या
शिक्षणासाठी जास्त मेहनत घ्यायचं तिच्या वडिलांनी ठरवलंय.

सविताच्या आईवडिलांकडे तिच्या ट्यूशनसाठी पैसे नव्हते. पण ट्युशन नसेल तरी काही बिघडत नाही, असं सवितानं ठरवलं आणि कसून अभ्यास केला. प्रसंगी उपाशी राहूनही ती शाळेत गेली. सविता ज्यांच्याकडे घरकाम करते त्यांनाही तिच्या यशाबद्दल आनंद झालाय.परीक्षेच्या काळात त्यांनीही सविताला घरकामात सूट दिली.

सविताचे शिक्षणाबद्दलचे इरादे बुलंद आहेत आणि ज्यांचे इरादे बुलंद असतात त्यांना परिस्थितीही थांबवू शकत नाही.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close