मनमाड-मालेगाव मार्गावरच्या भीषण अपघातात 8 जण ठार

June 10, 2015 9:22 AM0 commentsViews:

Manmad accident

09 जून : नाशिक जिल्ह्यात मनमाड-मालेगाव मार्गावर काल (मंगळवारी) मध्यरात्री 12च्या सुमारास टेम्पो, मारुती ओम्नी आणि ट्रक यांच्यात झालेल्या तिहेरी अपघातात 8 जण ठार, तर 9 जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

टेम्पो ट्रॅवल मनमाडकडे येत होता तर मारूती ओम्नी प्रवाशांना घेऊन मालेगावकडे जात होती. त्यावेळी मनमाडजवळ कुंदलगाव शिवारात भरधाव वेगाने येणार्‍या ट्रकने असताना समोरुन येणार्‍या टेम्पो जबर धडक दिली. याच दरम्यान ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या मारुती ओम्नी ट्रक आणि टेम्पोच्या मध्ये सापडली. हा अपघात एवढा भीषण होता की तिन्ही वाहनं चक्काचूर झाली आहेत.

या भीषण अपघातात तिन्ही वाहनातल्या एकूण 8 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले आहेत. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढण्याच्याची शक्यता आहे. मृतांमध्ये मालेगावचे 5 तर मनमाडच्या 3 जणांचा समावेश आहे. तर गंभीर जखमींना नाशिकच्या सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. अपघाता नंतर ट्रक चालक वाहनासह फरार झाला आहे. 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close