मनू शर्मा तिहारमध्ये हजर

November 10, 2009 1:01 PM0 commentsViews: 2

10 नोव्हेंबर जेसिका लाल हत्याकांड प्रकरणातला प्रमुख आरोपी मनू शर्मा तिहार जेलमध्ये हजर झाला. मनू शर्मा पॅरोलवर सुटून जेलबाहेर आला होता. 22 नोव्हेंबर रोजी त्याच्या पॅरोलची मुदत संपत होती. पण ही मुदत संपण्याच्या आतच तो जेलमध्ये पुन्हा हजर झालाय. मधल्या काळात जेलबाहेर राहून तो पॅरोलचे नियम मोडत असल्याची चर्चा होती. गेल्याच आठवड्यात मनू शर्मा एका पार्टीमध्ये हजर होता. त्याचा मित्र साहील धिंग्रा आणि अन्य आठ जणांना पोलिसांनी त्यावेळी अटक केली होती. पॅरॉलच्या काळात मनू शर्मा याला चंदीगडमध्ये राहण्यापुरतीच मोकळीक देण्यात आली होती. पण तो दिल्लीत दिसला होता. हे कायद्याचे उल्लंघन होते. पण आता तो स्वतःहूनच तिहार जेलमध्ये हजर झालाय.

close