राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची फेरनिवड

June 10, 2015 1:38 PM0 commentsViews:

sharad pawar 21

10 जून : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी शरद पवार यांची आज (बुधवारी) फेरनिवड करण्यात आली. पक्षाच्या 16 व्या वर्धापनदिनानिमित्त पाटण्यामध्ये राष्ट्रीय अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. तिथे एकमताने हा निर्णय घेण्यात आला आहे.

तसंच या अधिवेशनात आज वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होत आहे. बिहारच्या निवडणुकांच्या निमित्ताने आपली ताकद वाढवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. त्याचं पार्श्वभूमीवर, आपल्या भाषणामध्ये शरद पवारांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली.

अच्छे दिन फक्त मोदी आणि त्यांच्या जवळच्या लोकांचे आले आहेत. सामान्य लोकांना ते कुठे जवळपासही दिसत नसल्याचं शदर पावर यांनी म्हटलं आहे. आत्महत्यांच्या बाबतीत हे सरकार आकजड्यांमध्ये फेरफार करतंय. मन की बात मध्ये लोकांचे हाल कधी सांगितले जात नाहीत मराठवाडयात आत्महत्या झाल्या पण त्या सांगितल्या गेल्या नाहीत, असं पवार म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रीय अधिवेशनाला अजित पवारांची अनुपस्थिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय़ झाला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close