कल्याण डोंबिवली पालिकेच्या नगरसेवकांची पुन्हा टूर निघाली, 8 लाखांचा ‘कचरा’ ?

June 10, 2015 4:31 PM0 commentsViews:

Kalyan_Dombivli_Muncipal_Corporation10 जून : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नगरसेवक आणि अधिकार्‍यांनी गेल्या साडेचार वर्षात अभ्यास दौर्‍यांवर तब्बल 99 लाख रूपये खर्च केलेत. ते कमी की काय म्हणून महापालिकेने गुरूवारी घनकचरा प्रकल्प पाहणीसाठी हैदराबाद आणि आंध्रप्रदेश दौरा आयोजित करण्याचा घाट घातलाय. आता या नियोजित दौर्‍यावर पुन्हा 7 लाख 80 हजार रूपये खर्च करण्यात येणार आहे.

महापालिकेत घनकचर्‍यावर शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जात नाही त्या कारणावरून माहिती अधिकारी कार्यकर्ते कौस्तुभ गोखले यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणावरून न्यायालयाने महापालिकेला चांगलेच फटकारले आहे. नवीन बांधकामांना स्थगिती दिली आहे. त्याअनुषंगानेच महापालिकेने घनकचर्‍याचा प्रकल्प पाहणीसाठी हैदराबाद आणि आंध्रप्रदेश येथील वारांगल असा पाहणी दौरा आयोजित केला आहे.

आज रात्री हैदराबादकडे रवाना होणार असून 11 ते 13 जून असा तीन दिवसीय दौरा होणार आहे. या दौर्‍यासाठी महापौर आणि आयुक्त यांच्यासह 13 पदाधिकारी आणि 10 अधिकारी सहभागी होणार आहेत.

न्यायालयाच्या तोंडी आदेशानुसारच हा दौरा आयोजित करण्यात आल्याचं पालिका अधिकार्‍यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं.

अगोदरच महापालिकेच्या डोक्यावर कोट्यवधी रूपयांचे कर्जाचे डोंगर असतानाच अभ्यास दौर्‍यावर लाखो रूपये खर्च करण्याची नगरसेवक आणि अधिकार्‍यांची हौस काही फिटलेली दिसत नाही. सर्वसामान्य कल्याण डोंबिवलीकरांमध्ये याविषयी संतापाची भावना आहे.

आतापर्यंत अभ्यास दौर्‍यावर केलेला खर्च

- नोव्हेंबर 2011, गोवा… 10 लाख 60 हजार
– 12 मार्च 2012, गुजरात-राजस्थान… 18 लाख 90 हजार
– ऑगस्ट 2012, हैदराबाद … 8 लाख
– नोव्हेंबर 2013, बंगळुरू… 25 लाख 31 हजार
– नोव्हेंबर 20 13, केरळ… 32 लाख
– जानेवारी 2015, दिल्ली… 6 लाख

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close