‘ती’ला हॉर्ट स्पेशालिस्ट व्हायचं होतं…10 वीत 92 टक्के गूण मिळाले पण…

June 10, 2015 5:34 PM0 commentsViews:

aarya lagadगोविंद वाकडे, पिंपरी चिंचवड

10 जून : तिला शिकायचं होतं…मोठ होऊन तिला ह्रदयरोग तज्ज्ञ व्हायचं होतं…पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं…’ती’ जिद्दीने शिकलीही आणि दहावीच्या परीक्षेत तिला 92 टक्के गूण मिळाले पण हा आनंद साजरा करण्यासाठी ती आपल्यात नाहीये. आर्या लगडची ही कहाणी मनाला चटका लावून जाणारी आहे..

आर्या लगड…निरगस हास्याने सर्वांच मन जिंकणारी आता आर्या या जगात नाहीय…एका दुर्धर आजराने ग्रस्त असल्यामुळे आर्याचा मागील महिन्यात मृत्यू झाला. आपली मुलगी आपल्याला अशी अचानकपणे सोडून गेल्याच दुख, तिच्या कुटुंबीयांनी कसबस पचवल होतं. मात्र, 10 विचा निकाल लागला आणि आर्याची मार्क शीट हातात पडताच या सर्वांच्या दुःखाचा बांधच फुटला.

ऐन परीक्षेच्या काळात आर्याला आजारपणानं घेरलं होतं. मात्र, तिची जगण्याची उमेद आणि जिद्द मोठी होती आणि आजारपणावर मात करत आर्याने मिळवलेल हे यश महत्वपूर्ण आहे. खूप शिकून हृदय रोग तज्ज्ञ बनण्याचं तीच स्वप्न पूर्ण होण्या आधीच तीच हृदय मात्र बंद पडलं. आर्याच्या मेहनत फळाला आली त्यासाठी तीला गोंजारून कौतुक करणारे हात मात्र आज हतबल आहेत.

नियतीने आर्याला जीवनाच्या परीक्षेत नापास केलं खरं, मात्र तिने मिळवलेलं यश सदैव तिला जिवंत ठेवणारं आहे, आठवण म्हणून आणि आदर्श म्हणून…

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close